Tuesday, February 10, 2015

आई, मला पावसांत जाउं दे

 आई, मला पावसांत जाउं दे
 
आई, मला पावसांत जाउं दे
एकदांच ग भिजुनी मला चिंब चिंब होउं दे ॥धृ.॥

मेघ कसे हे गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगें अंगणांत मज खूप खूप नाचुं दे ॥१॥

खिडकीखालीं तळें साचलें
गुडघ्याइतकें पाणी भरलें
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग, लावुं दे ॥२॥

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करूं दे ॥३॥

धारेखालीं उभा राहुनी
पायानें मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाट्टेल तें होउं दे ॥४॥

गायक : योगेश खडीकर
गीतकार : वंदना विटणकर
संगीत : मीना खडीकर

No comments:

Post a Comment

नम्रतेचा महामेरू बहुत जनांसी आधारु 'राहुल द्रविड' - पराग पुजारी

एखाद्या माणसाबद्दलच्या आपल्या मनातल्या आदराला पण एक लिमिट असते. त्या लिमिटच्या बाहेर तो अगदी बियॉन्ड म्हणतात तसा जाऊ लागला की त्याला संत म...