Wednesday, July 29, 2015

अखेरचा सलाम....

 अखेरचा सलाम

हिंदूंचे तीर्थक्षेत्र रामेश्वर
तिथेच बहरला एक विज्ञानेश्वर

ना बुद्धीचा गर्व ना धर्माचा डंख
विहरला ज्ञान-आकाशात लावून अग्नीपंख

राष्ट्रोद्धारास्तव अर्पिली सदैव त्याने मती
जाहला निष्कलंक निष्कपट राष्ट्रपती

ऐसा नर न होणे पुन: नामे अब्दुल कलाम
विनम्र भावे करीतो त्यास अखेरचा सलाम......||

कवी - श्री. शीतल गांधी

No comments:

Post a Comment

दिवस

दिवस ओले-सुके, चिंब-ओले दिवस वर्षभर धुवून,झटकून वाळत घातले. काही खडखडीत वाळले, चुरचुरीत झाले. काही राहिले अर्धवट ओले, ...